DC vs RCB WPL 2024 Final: महिला प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम फेरीत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (DC vs RCB) होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांच्या नजरा त्यांच्या पहिल्या विजेतेपदावर आहेत. त्यांच्या पुरुष संघांनाही कधीही विजेतेपद मिळालेले नाही. यामुळे महिला प्रीमियर लीगला नवा चॅम्पियन मिळणार आहे. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने जेतेपदावर कब्जा केला होता. दरम्यान, दिल्लीने बंगळुरूविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, एलिस कॅप्सी, तानिया भाटिया (विकेटकीपर), मारिझान कॅप, शिखा पांडे, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, मिन्नू मणी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), एस मेघना, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, दिशा कसाट, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, शोभना आशा, रेणुका सिंग.
#WPLFinal #DCvRCB #WPL2024 #RCBvsDC
Delhi Capitals skipper Meg Lanning wins toss, opts to bat against RCB
FOLLOW LIVE: https://t.co/lvmYn2frH2 pic.twitter.com/om6NmWlKQY
— TOI Sports (@toisports) March 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)