इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये दररोज अनेक रोमांचक सामने खेळले जात आहेत. या भागात रविवारी पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (PBKS vs SRH) यांच्यात सामना होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. या सामन्यापूर्वी पंजाब किंग्जचे पारडे जड आहे. या संघाने स्पर्धेतील आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकले आहेत. तर सनरायझर्स हैदराबाद संघाने विजयाचे खातेही उघडलेले नाही. हैदराबाद संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल. हा सामना तुम्ही मोबाईलवर जिओ सिनेमावर पाहू शकता.
#punjabkings take on #sunrisershyderabad at Rajiv Gandhi Cricket Stadium#IPL2023 #ipl23 #PBKSvsSRH #SRHvsPBKS #OrangeArmy #Punjab #Hyderabad pic.twitter.com/jgpJ93WgIl
— Sport Spartans (@sport_spartans) April 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)