Iftikhar Ahmed Sixes: पाकिस्तानचा महान फलंदाज इफ्तिखार अहमदने (Iftikhar Ahmed) वहाब रियाझच्या (Wahab Riaz) एकाच षटकात 6 षटकार मारून इतिहास रचला आहे. इफ्तिखार अहमदही 6 चेंडूत 6 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. इफ्तिखार अहमदने टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज युवराज सिंहची (Yuvraj Singh) आठवण करून दिली. युवराज सिंहने 2007 साली खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 विश्वचषकातही इंग्लंडविरुद्ध एका षटकात 6 षटकार मारले होते. पाकिस्तान सुपर लीगपूर्वी क्वेटा आणि पेशावर यांच्यात खेळल्या जात असलेल्या प्रदर्शनीय सामन्यात इफ्तिखार अहमदने क्वेटाकडून खेळताना डावाच्या शेवटच्या षटकात सहा षटकार ठोकले. त्याचा व्हिडिओ पीसीबीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.
पहा व्हिडीओ
6⃣ 6⃣ 6⃣ 6⃣ 6⃣ 6⃣ 💪
Iftikhar goes big in the final over of the innings! 🔥
Watch Live ➡️ https://t.co/xOrGZzkfvl pic.twitter.com/CDSMFoayoZ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)