भारतीय महिला एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) ताज्या ICC क्रमवारीत एक स्थानाची झेप घेतली आहे. आयसीसीने मंगळवारी महिला फलंदाज आणि गोलंदाजांची ताजी क्रमवारी (ICC Women's Rankings) जाहीर केली. मिताली वगळता भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) वनडे गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तसेच महिला अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताची दीप्ती शर्मा चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)