टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाने न्यूझीलंडवर (New Zealand) 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह आयसीसी पुरुष कसोटी संघाच्या क्रमवारीत (ICC Men's Team Rankings) टीम इंडिया पुन्हा पहिल्या क्रमांकाच्या सिंहासनावर विराजमान झाला आहे. मुंबई कसोटीत विजयासह भारताचे आता 124 गुण झाले असून न्यूझीलंड 121 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)