पाकिस्तानचा आसिफ अली (Asif Ali) आणि अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद (Fareed Ahmed) यांना आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) सुपर फोर टप्प्यातील सामन्यादरम्यान मैदानावर हाणामारी केल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. दोघेही आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल 1 गुन्ह्यासाठी दोषी आढळले. आयसीसीच्या विधानानुसार, अलीने आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान अश्लील, आक्षेपार्ह किंवा अपमानास्पद हावभावांशी संबंधित असलेल्या ICC आचारसंहितेच्या कलम 2.6 चे उल्लंघन केले आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फरीद अहमदला सेक्शन 2 . 1. 12 दिला असुन जो खेळाडू, सपोर्ट स्टाफ, पंच, सामनाधिकारी किंवा कोणत्याही व्यक्तीशी अयोग्य शारीरिक संपर्काशी संबंधित आहे. बुधवारी शारजाहमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फरीद अहमद बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अलीने त्याची बॅट उचलली. आसिफची विकेट घेतल्यानंतर फरीद त्याच्या जवळ येऊन सेलिब्रेशन करत होता. या खेळाडूंमधील संघर्षाचा फटका दोन्ही संघांच्या चाहत्यांनाही बसला.
Asif Ali and Fareed Ahmad charged with breaching the ICC Code of Conduct.
Details 👇 https://t.co/20XEWzHhQt
— ICC (@ICC) September 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)