IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 69 वा सामना (IPL 2024) आज सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज (SRH vs PBKS) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा चार गडी राखून पराभव केला आहे. तत्पूर्वी, पंजाब किंग्जचा कर्णधार जितेश शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 214 धावा केल्या. पंजाब किंग्जच्या वतीने सलामीवीर प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 71 धावांची खेळी खेळली. सनरायझर्स हैदराबादकडून टी नटराजनने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने 19.1 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. सनरायझर्स हैदराबादकडून सलामीवीर अभिषेक शर्माने सर्वाधिक 66 धावांची खेळी केली. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले.
Match 69. Sunrisers Hyderabad Won by 4 Wicket(s) https://t.co/K5rcY5ZGvq #TATAIPL #IPL2024 #SRHvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) May 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)