Harry Brook Banned Two Years IPL: इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रुकवर (Harry Brook) बीसीसीआयने (BCCI) दोन वर्षांची बंदी घातली आहे. आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी ब्रूकने स्पर्धेतून माघार घेतली आहे. माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ब्रुकच्या या कृत्यावर मोठे पाऊल उचलले आहे आणि त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. याचा अर्थ असा की, हा इंग्लिश फलंदाज पुढील दोन वर्षे इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपये खर्च करून ब्रूकला संघात सामील केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)