भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना माऊंट मौनगानुई येथे खेळला गेला. भारताने हा सामना 65 धावांनी जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 6 गडी गमावून 191 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 18.5 षटकांत 126 धावा करत सर्वबाद झाला. या सामन्याचा नायक सूर्यकुमार यादव (Surya Kumar Yadav) होता ज्याने शतक झळकावले आणि गोलंदाजीत दीपक हुडाने (Deepak Hooda) 4 विकेट घेत आश्चर्यकारक कामगिरी केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)