इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. IPL 2023 मध्ये आज गुरुवारी एक मोठा सामना खेळवला जात आहे. आजचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या नितीश राणाकडे आहे. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची जबाबदारी फाफ डू प्लेसिसच्या खांद्यावर आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 204 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून डेव्हिड विली आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 20 षटकात 205 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला 5 वा मोठा धक्का बसला. शाहबाज अहमद 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ स्कोअर 61/5 आहे.
Match 9. WICKET! 8.5: Shahbaz Ahmed 1(5) ct Shardul Thakur b Sunil Narine, Royal Challengers Bangalore 61/5 https://t.co/J6wVwbsfV2 #TATAIPL #KKRvRCB #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)