कोलंबो: भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका उद्यापासून सुरू होत आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच एका अनुभवी परदेशी खेळाडूने टीम इंडियाच्या कॅम्पमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाच्या विजयात योगदान देण्यासाठी हा खेळाडू पूर्णपणे तयार आहे. संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या पसंतीचा हा खेळाडू संपूर्ण श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियासोबत राहणार आहे. टीम इंडियात सामील झालेला हा खेळाडू नेदरलँडचा माजी स्टार क्रिकेटर रायन टेन डोशेट आहे. रायन टेन डोशेट सहाय्यक प्रशिक्षक म्हणून टीम इंडियामध्ये सामील झाला आहे. गौतम गंभीरने बीसीसीआयकडे स्वत:साठी 2 सहाय्यक प्रशिक्षकांची मागणी केली होती, त्यावर बीसीसीआयने त्याला 2 सहाय्यक प्रशिक्षक उपलब्ध करून दिले आहेत. रायन टेन डोशेटे व्यतिरिक्त अभिषेक नायर गौतम गंभीरचा सहाय्यक प्रशिक्षक आहे. रायन टीम इंडियाच्या श्रीलंकेतील कॅम्पमध्ये सामील झाला आहे. त्याचवेळी अभिषेक नायर टीम इंडियासोबत श्रीलंकेला रवाना झाला होता. रायन डोशेट आणि अभिषेक नायर या दोघांनीही आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी गौतम गंभीरसोबत काम केले होते आणि दोघेही गौतम गंभीरचे आवडते मानले जातात.
Ryan ten Doeschate has joined the Indian team in Sri Lanka as an assistant coach.
📸: RevSportz pic.twitter.com/fvWHU63hym
— CricTracker (@Cricketracker) July 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)