आयसीसी विश्वचषक 2023 च्या 18 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात शुक्रवारी (20 ऑक्टोबर) बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) याच्यात सामना खेळवला जात आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आज कोणताही संघ हरला तर त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचा मार्ग सोपा नसेल. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघ संघर्ष करताना दिसत असून सलग दोन सामने गमावल्यानंतर अखेरच्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून पहिला विजय नोंदवला. तर पाकिस्तान संघाने पहिल्या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत आणि शेवटच्या सामन्यात भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर 368 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलिया कडून डेविड वार्नर 163 आणि मिचेल मार्श 121 सर्वाधिक धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी 4 आणि हरिस रौफने तीन विकेट घेतल्या. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 368 धावा करायच्या आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्ताने शानदार सुरुवात केली आहे, सलामीवीर इमाम - शफीकचे अर्धशतक पूर्ण करुना 100च्या पुढे धावसंख्यने गेले आहे. पाकिस्तानचा स्कोर 115/0
- Hundred vs Sri Lanka.
- Fifty vs Australia.
Abdullah Shafique making big statements in the World Cup at the age of 23. pic.twitter.com/97PXU1S8R1
— Johns. (@CricCrazyJohns) October 20, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)