पाकिस्तान बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम खान (Wasim Khan) यांना ICC मध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. वसीम यांची आयसीसीचे (ICC) महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पुढील महिन्यात ते पदभार स्वीकारतील. आयसीसीने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. खान यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board), लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब आणि चान्स टू शाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)