पश्चिम बंगाल सरकारने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या सुरक्षा श्रेणीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गांगुली यांना प्रदान करण्यात आलेल्या Y श्रेणीच्या सुरक्षेचा कार्यकाळ संपल्यानंतर मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. आता त्यांना Z सुरक्षा प्रदान करण्यात आली. व्हीव्हीआयपीचे सुरक्षा कवच कालबाह्य झाल्यामुळे, प्रोटोकॉलनुसार पुनरावलोकन केले गेले आणि गांगुलीची सुरक्षा झेड श्रेणीत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
ट्विट
Former Indian cricket captain Sourav Ganguly's security cover to be upgraded to Z category by West Bengal Govt, say officials
(file pic) pic.twitter.com/CXwSdqflFp
— ANI (@ANI) May 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)