England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team, Day 1 Tea Break Scorecard: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri Lanka National Cricket) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघाने श्रीलंकेचा 190 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंड संघाचे नेतृत्व ओली पोप करत आहेत तर श्रीलंकेचे नेतृत्व धनंजय डी सिल्वा करत आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. इंग्लंडने युवा जोश हलचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये केला आहे. दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडने पहिल्या डावात चहापानाच्या विश्रांतीपर्यंत 40 षटकांत तीन गडी गमावून 194 धावा केल्या होत्या. कर्णधार ओली पोप 84 धावा करून खेळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)