England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 2nd Test: गुरुवारपासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri anka National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील स्टेडियमवर (Lords Stadium) खेळवला जात आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला होता. इंग्लंड संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 54.3 षटकात 251 धावा करत सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात अनुभवी फलंदाज जो रूटने इंग्लंडकडून 103 धावांची शानदार खेळी केली. जो रूटने 111 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने शतक झळकावले. जो रूटशिवाय हॅरी ब्रूकने 34 धावा केल्या. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो आणि लाहिरू कुमाराने प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. या दोघांशिवाय मिलन प्रियनाथ रथनायके आणि प्रभात जयसूर्या यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला 430 धावांची गरज आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने दुसऱ्या डावात 53 धावांत दोन गडी गमावले आहे. तसेच भारतातील चाहते या सामन्याचा आनंद सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि सोनी लाइव्ह ॲपवर स्ट्रिमिंगचा आनंद घेवू शकतात.
Sri Lanka face an uphill battle to keep the series alive - they start Day 4 needing 430 runs with eight wickets in hand.#ENGvSL ball-by-ball: https://t.co/oB12ulMrCQ pic.twitter.com/6pcAYVvdMb
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)