इंग्लंडचा क्रिकेट संघ (England) 17 वर्षानंतर पहिल्या पाकिस्तान (Pakistan) दौऱ्यासाठी गुरुवारी (15 सप्टेंबर) कराचीला पोहोचला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंडने पाकिस्तान दौरा न करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने 2005 मध्ये पाकिस्तानमध्ये शेवटचा सामना खेळला होता. इंग्लंडचा संघ गेल्या वर्षीच पाकिस्तानचा दौरा करणार होता, पण सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने दौरा रद्द केल्याचे पाहून इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही माघार घेतली. गेल्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाकिस्तानमध्ये परतले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल 24 वर्षांनंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता आणि तोही यशस्वीपणे संपला. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड T20 विश्वचषक आणि इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी आज म्हणजेच गुरुवारी संघाची घोषणा करू शकते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)