न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) दुसर्‍या कसोटी सामन्यात 8 विकेटने इंग्लंडच्या (England) पराभवानंतर इंग्लिश संघाचे माजी कर्णधार केविन पीटरसनने (Kevin Pietersen) कसोटी क्रिकेटमधील संघाच्या फलंदाजी संकटांचे कारण स्पष्ट केले आहे. पीटरसनने इंग्लंडच्या कसोटी संकटांसाठी फ्रॅन्चायझी क्रिकेटला जबाबदार धरले आहे आणि इंग्लंड संघातील किती खेळाडू आज काऊन्टीच्या पूर्ण हंगामात खेळत नाहीत याकडे लक्ष वेधले. “फ्रँचायझी टी-20 सुरू झाल्यापासून, GREATS ने आजपर्यंत काउंटी क्रिकेटचा संपूर्ण हंगाम खेळलेला नाही. काउंटी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यांच्यात प्रचंड अंतर आहे, त्यामुळे कसोटी सामन्यातील फलंदाजीचा त्रास होईल,” पीटरसनने ट्विटमध्ये लिहिले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)