IND vs ENG 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील शेवटचा कसोटी सामना (IND vs ENG 5th Test) धर्मशाळा (Dharamashala) येथे खेळला जात आहे. या सामन्यातून देवदत्त पडिक्कलने कसोटी पदार्पण (Devdutt Padikkal Debut) केले आहे. या मालिकेत टीम इंडियासाठी (Team India) कसोटी पदार्पण करणारा देवदत्त हा (Devdutt Padikkal) पाचवा खेळाडू ठरला आहे. वास्तविक, धर्मशाळा कसोटी सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान टीम इंडियाचा एक खेळाडू जखमी झाला होता. त्यानंतर आता पडिक्कलचे नशीब उघडले आहे. होय, आम्ही रजत पाटीदारबद्दल बोलत आहोत. नाणेफेकीनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, रजत पाटीदारला एक दिवस आधी सराव करताना दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला धर्मशाळा कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले आहे आणि देवदत्त पडिक्कलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. (हे देखील वाचा: Ravi Ashwin 100 Test Match: 100व्या कसोटीसामन्यासाठी रवी अश्विनला देण्यात आली विशेष कॅप, अश्विनच्या कुंटूबासाठी खास क्षण)

पाहा फोटो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)