DC vs MI, TATA IPL 2025 29th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 29 वा सामना आज म्हणजेच 13 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या हंगामात, दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. तर, मुंबईची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात अद्याप एकही सामना गमावलेला नाही. तर, मुंबई इंडियन्स संघाने पाच सामने खेळून फक्त एकच सामना जिंकला आहे. दरम्यान, या रोमांचक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
🚨 Toss 🚨@DelhiCapitals won the toss and elected to bowl against @mipaltan in Delhi.
Updates ▶ https://t.co/sp4ar866UD#TATAIPL | #DCvMI pic.twitter.com/i7RqDJaMSB
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)