आयपीएल 2023 च्या 34 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. दिल्लीने हैदराबादचा सात धावांनी पराभव केला. दरम्यान, दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 9 गडी गमावून 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 137 धावा करू शकला. यामध्ये अक्षर पटेलने 34, मनीष पांडेने 43 आणि डेव्हिड वॉर्नरने 21 धावा केल्या आहेत. 145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला 6 गडी गमावून केवळ 137 धावा करता आल्या, त्यात मयंक अग्रवालने 49 धावा केल्या.
Match 34. Delhi Capitals Won by 7 Run(s) https://t.co/PvfLJ7oumC #TATAIPL #SRHvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)