DC vs KKR IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या  (IPL) 25व्या सामन्यात पहिले फलंदाजी करून 6 विकेट गमावून 154 धावांपर्यंत मजल मारली आणि दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) विजयासाठी 155 धावांचे आव्हान दिले आहे. कोलकाताकडून आंद्रे रसेलने (Andre Russell) सर्वाधिक नाबाद 45 धावा केल्या तर शुभमन गिलने 43 धावांचे योगदान दिले. पॅट कमिन्स 11 धावा करून नाबाद परतला. रसेल आणि गिलला वगळता अन्य खेळाडू बॅटने प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. कर्णधार इयन मॉर्गन, सुनील नारायण बोपल न फोडता माघारी परतले. दुसरीकडे, दिल्लीचे गोलंदाज आक्रमक भूमिकेत दिसले. अक्षर पटेल (Axar Patel) व ललीत यादव (Lalit Yadav) यांनी प्रत्येकी 2 विकेट काढल्या तर आवेश खान व मार्कस स्टोइनिसला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)