भारताच्या पहिल्या कसोटी संघाचे कर्णधार सी.के. नायडू यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1895 रोजी नागपूर, महाराष्ट्र येथे झाला. कर्नल कोट्टारी कनकैय्या नायडू यांना प्रेमाने सी.के. म्हणत. भारताच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्यांनी भारतीय संघाचा कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारली होती. हा सामना 1932 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला गेला होता. इंग्लंड संघ पूर्णपणे बलाढ्य असला तरी सी.के. नायडू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जोरदार मुकाबला केला होता.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)