Chennai Super King Won IPL Final 2023: चेन्नईने गुजरातला हरवून जेतेपद पटकावले, पाचव्यांदा ठरले चॅम्पियन, जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत केल्या 10 धावा

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. या रोमांचक सामन्यात, चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा विकेट पराभव करुन पाचव्यांदा आयपीएल विजेतेपदावर कब्जा केला.

Chennai Super King Won IPL Final 2023: चेन्नईने गुजरातला हरवून जेतेपद पटकावले, पाचव्यांदा ठरले चॅम्पियन, जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत केल्या 10 धावा
CSK (Photo Credit - Twitter)

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या मोसमाचा अंतिम सामना (IPL Final 2023) आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Chennai Super King vs Gujarat Titans) यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. या रोमांचक सामन्यात, चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सचा विकेट पराभव करुन पाचव्यांदा आयपीएल विजेतेपदावर कब्जा केला. तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 96 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून मथिशा पाथिरानाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार, चेन्नई सुपर किंग्ज संघाला सामना जिंकण्यासाठी 15 षटकात 170 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने षटकात विकेट गमावून लक्ष्य गाठले आणि त्यांना केवळ धावा करता आल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून डेव्हॉन कॉनवे 47, शिवम दुबे 32 अजिंक्य रहाणे 27 यांनी सर्वाधिक धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून नूर अहमदने सर्वाधिक दोन बळी घेतले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 30, 2023 01:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).