CAN vs IRE T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 चा 13 वा सामना (T20 Workd Cup 2024) आज कॅनडा आणि आयर्लंड (CAN vs IRE) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात कॅनडाने आयर्लंडचा 12 धावांनी पराभव केला आहे. यासह कॅनडाने पहिला विजय नोंदवला आहे. तत्पूर्वी, आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर कॅनडाच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सात गडी गमावून 137 धावा केल्या. कॅनडाकडून निकोलस किर्टनने 49 धावांची शानदार खेळी केली. आयर्लंडकडून क्रेग यंग आणि बॅरी मॅककार्थीने प्रत्येकी दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना आयरिश संघाला 20 षटकांत सात गडी गमावून केवळ धावा करता आल्या. आयर्लंडकडून मार्क एडेअरने सर्वाधिक 34 धावांची खेळी खेळली. कॅनडाकडून डिलन हेलिगर आणि जेरेमी गॉर्डन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
Canada WIN in New York! 🇨🇦
A superb bowling performance from them against Ireland sees them register their first Men's #T20WorldCup win 👏#CANvIRE | 📝: https://t.co/rYLPhX7ldC pic.twitter.com/axdtyEFrDg
— ICC (@ICC) June 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)