England National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 2nd Test: गुरुवारपासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ (Sri anka National Cricket Team) यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना लंडनमधील स्टेडियमवर (Lords Stadium) खेळवला जात आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला होता. इंग्लंड संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. त्याआधी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दुसऱ्या डावात 25 धावा केल्या होत्या. आता तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडने 4 विकेट गमावून 159 धावा करुन 390 धावांची आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे श्रीलंका पाचव्या विकेटच्या शोधात आहे.
England score 134 before lunch to extend their lead to 390 runs 💪#ENGvSL ball-by-ball: https://t.co/kKZqez4cco pic.twitter.com/b5YiQ0r2OV
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)