बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 च्या पहिल्या कसोटीत भारताचा सामना गुरूवार, 09 फेब्रुवारी 2023 रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. नागपूरच्या जामठा स्टेडियमवर हा सेमाना खेळला जाईल. आता या सामान्याआधी मैदानातील धावपट्टीबाबत जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो ट्रॅक्टरने शेतात नांगरणी करताना दिसत आहे. हीच संधी साधून भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला आपल्या खेळपट्टीच्या मुद्द्यावरून चिडवायला सुरुवात केली आहे. भारतीय क्रिकेटप्रेमींनी सामान्यापूर्वी धोनी हे मैदान नांगरत असल्याच्या आशयाचे ट्वीट शेअर केले आहेत. सामान्यासाठी धोनीला धावपट्टी तयार करण्याचे काम दिले असल्याचे विनोद सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

— 𝕍𝕀𝕁𝔸𝕐 (@Rishabhvj___) February 8, 2023

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)