DC vs RCB WPL 2024 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने रविवारी महिला प्रीमियर लीग (WPL) च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 18.3 षटकात 113 धावा केल्या. आरसीबीने 19.3 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य सहज गाठले. आरसीबीचे हे पहिले विजेतेपद आहे. बंगळुरूच्या पुरुष संघाने कधीही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही, परंतु महिला संघाने डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रात विजय मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना सोफी डिव्हाईन आणि स्मृती मानधना यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली आणि दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावा जोडल्या. ही भागीदारी शिखा पांडेने 32 धावा करणाऱ्या डिव्हाईनला बाद करून तोडली. यानंतर कर्णधार मानधनाने डावाची धुरा सांभाळली, मात्र मिन्नू मणीने तिला 31 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर एलिस पेरी आणि रिचा घोष यांनी अखेरच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला.
#WPLFinal #WPL2024 #DCvRCB #RCBvDC
It's all over!
RCB clinch maiden WPL title
Royal Challengers Bangalore (115/2) beat Delhi Capitals (113) by 8 wickets in final
Follow: https://t.co/lvmYn2frH2 pic.twitter.com/kWEFWCIChm
— TOI Sports (@toisports) March 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)