Pakistan New Head Coach: आगामी टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) माजी भारतीय प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांची पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी याला कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. लवकरच दोन्ही प्रशिक्षक संघात सामील होतील. तर पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अझहर महमूदला सर्व फॉरमॅटसाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. (हे देखील वाचा: Shaharyar Khan Dies: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शहरयार खान यांचे निधन, PCB ने व्यक्त केला शोक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)