आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. अनेक स्टार खेळाडूंनी येथे खेळून आपली कारकीर्द घडवली आहे. प्रत्येकजण आयपीएल 2023 च्या हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहे. आयपीएल 2023 चा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात 31 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. गुजरात टायटन्सने गेल्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले, परंतु आता आयपीएल 2023 च्या आधी गुजरात टायटन्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. त्यांचा एक स्टार खेळाडू जखमी झाला आहे. आयपीएल 2023 च्या लिलावात गुजरात टायटन्सने आयर्लंडच्या जोस लिटलला 4.40 कोटी रुपयांना विकत घेतले. आयपीएल लिलावात विकत घेतलेला जोस हा आयर्लंडचा पहिला खेळाडू ठरला. SA20 मध्ये प्रिटोरिया कॅपिटल्सकडून खेळताना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे जोस लिटलला संपूर्ण पाकिस्तान सुपर लीग हंगामातून बाहेर काढण्यात आले आहे. चांगल्या उपचारासाठी तो आपल्या देशात परतला आहे. पीएसएलचा अंतिम सामना 19 मार्चला होणार आहे. त्याच वेळी, आयपीएल 31 मार्चपासून सुरू होत आहे. अशा स्थितीत जोस लिटलची दुखापत अधिक गंभीर असेल, तर त्याला आयपीएलमध्ये खेळणे कठीण वाटते.
Josh Little, who was due to play for Multan Sultans in the PSL, will miss the entire tournament due to injury
Details 👉 https://t.co/HK8X60UvjY #PSL2023 pic.twitter.com/gzMlZQmY78
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)