Jay Shah यांचा मोठा निर्णय! कर्करोगाशी लढा देत असलेल्या Anshuman Gaekwad यांना BCCI देणार एक कोटी रुपये
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह (Jay Shah) यांच्या विनंतीवरून, बीसीसीआयने (BCCI) अंशुमन गायकवाड यांच्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी त्वरित प्रभावाने जारी केला आहे. जेणेकरून त्यांना उपचारात कोणतीही अडचण येऊ नये.
भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) सध्या ब्लड कॅन्सरने त्रस्त आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र त्यांना आर्थिक मदतीची गरज होती आणि आता बीसीसीआय त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह (Jay Shah) यांच्या विनंतीवरून, बीसीसीआयने (BCCI) अंशुमन गायकवाड यांच्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी त्वरित प्रभावाने जारी केला आहे. जेणेकरून त्यांना उपचारात कोणतीही अडचण येऊ नये. एवढेच नाही तर जय शहा यांनी अंशुमनच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 71 वर्षीय क्रिकेटरची अवस्था पाहून कपिल देव यांनी एक दिवस आधी बीसीसीआयकडे मदतीचे आवाहन केले होते आणि पेन्शन दान करण्याचा निर्णयही घेतला होता. यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनीही या मदतीला हातभार लावला, ज्यात मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, मदन लाल आणि कीर्ती आझाद यांची नावे आहेत. त्याचबरोबर आता बीसीसीआयनेही अंशुमनला मदतीचा हात पुढे केला असून एक कोटी रुपयांचा निधीही जारी केला आहे.
BCCI Secretary Jay Shah instructed BCCI to release Rs 1 crore with immediate effect to provide financial assistance to India’s veteran cricketer Anshuman Gaekwad, who is battling cancer. Shah also spoke to Gaekwad's family and took stock of the situation and provided assistance:…
— ANI (@ANI) July 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2024 04:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

