बांगलादेशने विश्वचषक 2023 मध्ये सलग सहा सामने गमावल्यानंतर सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेचा 3 गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह बांगलादेशचे 4 गुण झाले आहेत. बांगलादेश संघाच्या विजयासह तीन संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. बांगलादेश आणि इंग्लंड आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. आता श्रीलंकाही अधिकृतपणे अंतिम 4 च्या शर्यतीतून बाहेर आहे. श्रीलंकेचा सध्याच्या स्पर्धेतील हा सहावा पराभव आहे. विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशने प्रथमच श्रीलंकेचा पराभव केला आहे. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर प्रथम खेळताना श्रीलंकेच्या संघाने 49.3 षटकात सर्व गडी गमावून 279 धावा केल्या होत्या. चरित असलंकाने 105 चेंडूत 108 धावांची उत्कृष्ट शतकी खेळी केली. बांगलादेशकडून तनझिम हसनने गोलंदाजीत 3 बळी घेतले. तर शाकिब अल हसन आणि शोरीफुल इस्लाम यांना प्रत्येकी 2 यश मिळाले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने 41.1 षटकांत 7 गडी गमावून तीन विकेट्स राखून सामना जिंकला. (हे देखील वाचा: मोठ्या संकटात Angelo Mathews! चुकीच्या वागणुकीमुळे ICC करु शकते मोठी कारवाई (Watch Video)
BANGLADESH HAVE DEFEATED SRI LANKA IN DELHI....!!!
The GOAT rivalry! pic.twitter.com/WodzWdT213
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)