RR vs RCB, IPL 2024 Eliminator: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये (IPL 2024) राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RR vs RCB) यांच्यात एलिमिनेटर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर, विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगळुरूने राजस्थानसमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आरसीबीकडून रजत पाटीदार सर्वाधिक 34 धावा केल्या. तर दुसरीकडे, राजस्थानकडून आवेश खानने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा स्कोअर 86/3.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)