रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा (SRH vs RCB) आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला असून प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. हैदराबादचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने दोन गडी गमावून लक्ष्य गाठले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)