Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारतीय क्रिकेट संघासाठी सिडनी कसोटीतून कोणतीही चांगली बातमी येत नाही. टीम इंडियाचे कर्णधार असलेला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) दुखापत झाली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याला दुखापत झाल्याने त्याला मैदान सोडावे लागले. बुमराहच्या अनुपस्थितीत विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह खेळाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या लंचनंतर दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर गेला. सिडनीतून आलेल्या बातमीनुसार, त्याला स्कॅनिंगसाठी नेण्यात आले आहे. सध्या विराट कोहली या सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडत आहे.
🚨 BUMRAH LEAVES FOR SCANS. 🚨
- Fingers are crossed...!!! 🤞pic.twitter.com/HAdB2tudiX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 4, 2025
🚨 JASPRIT BUMRAH OFF THE FIELD AND NOT WEARING THE WHITES. 🚨
- Hope Boom is fine! 🤞pic.twitter.com/xwuNTlhYGC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 4, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)