2023च्या विश्वचषकात आज दोन सामने खेळले जात आहेत. पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (AUS vs NZ) यांच्यात धर्मशाला येथे होत आहे. येथील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना नेहमीच चांगली मदत मिळत आहे. या विश्वचषकात न्यूझीलंडचा संघ चमकदार कामगिरी करत आहे. किवी संघाने आतापर्यंत पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. तो आठ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाने पाचपैकी तीन सामने जिंकले असून गुणतालिकेत सहा गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. किवी संघात एक बदल करण्यात आला आहे. मार्क चॅपमनच्या जागी जेम्स नीशमला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. ट्रॅव्हिस हेडचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने 49.2 षटकात 388 धावा करत सर्वबाद 388 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 109 धावांची खेळी खेळली. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला 50 षटकांत 389 धावा करायच्या आहेत.
Head 109 (67).
Warner 81 (65).
Maxwell 41 (24).
Inglis 38 (28).
Cummins 37 (14).
Australia bowled out for 388 against New Zealand - from 387/6 to 388/10. pic.twitter.com/yDOJ7ARmx6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)