लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद (LSG vs SRH) यांच्यात शुक्रवारी म्हणजेच 7 एप्रिल रोजी सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाचा एकही खेळाडू करिष्माई खेळी खेळू शकला नाही. मात्र, काहीवेळपर्यंत आघाडीचा फलंदाज राहुल त्रिपाठीने स्थिरावलेली खेळी खेळण्याचा प्रयत्न केला. पण, त्रिपाठीने विचित्र शॉट खेळण्याच्या प्रक्रियेत शॉर्ट थर्ड मॅनवर उभ्या असलेल्या अमित मिश्राकडे (Amit Mishra) त्याचा झेल सोपवला. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मिश्रा यांनी सुमारे 5 सेकंद हवेत उडी मारली आणि डायव्हिंग करताना हा उत्कृष्ट झेल पकडला. ज्याचा तुम्ही स्वतः व्हिडिओ पाहून अंदाज लावू शकता.
ICYMI - A brilliant diving catch by @MishiAmit ends Rahul Tripathi's stay out there in the middle.#TATAIPL #LSGvSRH pic.twitter.com/uJkjykYlJt
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)