टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 4 ऑगस्टला आशिया कप 2022 च्या सुपर 4 टप्प्यात पाकिस्तानविरुद्ध आसिफ अलीचा एक झेल सोडला. तेव्हापासून अर्शदीप सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. पण आता हे प्रकरण आणखी पुढे गेले आहे. मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर टीम बसमध्ये चढत असताना एका चाहत्याने अर्शदीपला ‘देशद्रोही’ म्हटले, त्यानंतर अर्शदीप खूप संतापलेला दिसत होता. मात्र, त्यानंतर तेथे उपस्थित पत्रकाराने या चाहत्याला चांगलेच फटकारले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अर्शदीप आल्यानंतर त्याच्याविषयी कमेंट्स केल्या गेल्या. मात्र त्यानंतर क्रीडा पत्रकार विमल कुमार यांनी अपशब्द वापरणाऱ्या चाहत्याचा चांगलाच क्लास घेतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)