RCB vs KKR, IPL 2024: आज, आयपीएल 2024 च्या 36 व्या (IPL 2024) सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (KKR vs RCB) यांच्यांत सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. दरम्यान, आरसीबीने केकेआरविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजीला आलेल्या केकेआरने आरसीबीसमोर 223 धांवांचे लक्ष्य ठेवले आहे. कोलकाताकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. आरसीबीसाठी यश दयाल आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 20 षटकात 223 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आरसीबीला पहिला धक्का लागला आहे. आरसीबीचा स्कोर 35/1
Match 36. WICKET! 2.1: Virat Kohli 18(7) ct & b Harshit Rana, Royal Challengers Bengaluru 27/1 https://t.co/hB6cFsk9TT #TATAIPL #IPL2024 #KKRvRCB
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)