IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी (IND vs ENG 3rd Test) राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळली जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. मुंबईचा युवा फलंदाज सरफराज खानने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पदार्पण केले. सरफराज खानने राजकोटमध्ये पहिल्या डावात 62 धावांची शानदार खेळी केली. राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवशी सरफराजने पूर्णपणे वर्चस्व गाजवले. सर्वजण सरफराज खानच्या मेहनतीचे आणि क्रिकेटप्रेती असलेल्या समर्पणाचे कौतुक करत आहेत. दरम्यान, देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सरफराजच्या वडिलांना कार भेट देण्याची घोषणा केली आहे. आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर सरफराज खानचे कौतुक केले आणि त्याच्यासाठी खास संदेशही लिहिला. आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, हिंमत हारता कामा नये. कठोर परिश्रम, धैर्य आणि संयम. मुलामध्ये प्रेरणा देण्यासाठी वडिलांसाठी यापेक्षा चांगला गुण कोणता असू शकतो? एक प्रेरणादायी पालक असल्याने नौशाद खान यांनी थारची भेट स्वीकारली तर ती माझ्यासाठी आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट ठरेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)