Noor Ali Zadran Retirement: अफगाणिस्तानचा फलंदाज नूर अली जद्रान (Noor Ali Zadran) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. नूर अलीने अफगाणिस्तानसाठी अनेक प्रसंगी चांगली कामगिरी केली आहे. मात्र तो भारताविरुद्ध फ्लॉप ठरला आहे. नूर अलीने भारताविरुद्ध एकूण 3 सामने खेळले असून या कालावधीत त्याला केवळ 82 धावा करता आल्या आहेत. नूर या वर्षी फेब्रुवारीमध्ये अफगाणिस्तानसाठी शेवटचा सामना खेळला होता. तो बऱ्याच दिवसांपासून टी-20 आणि एकदिवसीय संघातून बाहेर आहे. नूरने 2009 मध्ये अफगाणिस्तानसाठी डेब्यू एकदिवसीय सामना खेळला होता. यानंतर 2010 मध्ये त्याने टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. (हे देखील वाचा: WPL 2024 Points Table: मुंबई इंडियन्सचे जोरदार पुनरागमन, यूपी वॉरियर्सचा 42 धावांनी केला पराभव; जाणून घ्या पॉइंट टेबलची स्थिती)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)