आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेतील शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 19.4 षटकांत केवळ 105 धावा करू शकला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 59 चेंडू राखून 8 गडी राखून सामना जिंकला. श्रीलंकेकडून भानुका राजपक्षेने 38 आणि चमिका करुणारत्नेने 31 धावांचे योगदान दिले. राजपक्षेने 29 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार मारला तर करुणारत्नेने 38 चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. अफगाणिस्तानकडून कर्णधार मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमानने प्रत्येकी दोन तर नवीन-उल-हकने एक विकेट घेतली.
Tweet
Afghanistan register a thumping win on the opening day of #AsiaCup2022#SLvAFG | 📝 Scorecard: https://t.co/YV4rkrnw07 pic.twitter.com/bRxMwLGJ1r
— ICC (@ICC) August 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)