IND vs AFG 1st T20I: टीम इंडिया आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघ मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळण्यासाठी आले आहेत. टीम इंडियाची कमान रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान संघाचे कर्णधारपद इब्राहिम झद्रानच्या (Ibrahim Zhadran) खांद्यावर आहे. दरम्यान, मोहालीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने भारतासमोर 159 धावाचे लक्ष्य ठेवले आहे. अफगाणिस्तान संघाकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 159 धावा करायच्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)