लखनौच्या एकाना स्टेडियमवर शुक्रवारी नेदरलँड आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळवला जात आहे. सध्याच्या विश्वचषकाच्या या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या दोन्ही संघांची कामगिरी दमदार झाली आहे. अफगाणिस्तानने 6 सामने खेळले असून 3 जिंकले आहेत. तर नेदरलँड्सने 6 पैकी 2 सामने जिंकले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही संघांनी मोठ्या संघांना पराभूत केले आहे. या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल केले जाऊ शकतात. दरम्यान, नेदरलँडचा कर्णधार सायब्रँड एंजेलब्रेक्टने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या नेदरलँडचा संपूर्ण संघ 46.3 षटकांत केवळ 179 धावा करू शकला नाही. नेदरलँड्ससाठी कर्णधार सायब्रँड एंजेलब्रेक्टने 58 धावांची शानदार खेळी केली. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी अफगाणिस्तान संघाला 50 षटकात 180 धावा करायच्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)