इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 49 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स (MI vs CSK) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात नंबर टू होण्यासाठी लढत आहे. आज जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असेल. इतकंच नाही तर त्याच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याची शक्यताही वाढणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मुंबईचा रेकॉर्ड CSK पेक्षा मजबूत आहे. या मैदानावर दोन्ही संघांमधले गेले पाच सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या हाय व्होल्टेज सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचे संघ या दिग्गज खेळाडूंसोबत मैदानात उतरले आहेत.
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कॅण्ड विकेट), दीपक चहर, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महेश थिकशन.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, आकाश मधवाल, अर्शद खान.
Match 49. Mumbai Indians XI: R Sharma (c), I Kishan (wk), C Green, S Yadav, T David, T Stubbs, N Wadhera, A Khan, P Chawla, A Madhwal, J Archer. https://t.co/hpXamvn55U #TATAIPL #CSKvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
Match 49. Chennai Super Kings XI: D Conway, R Gaikwad, A Rahane, M Ali, S Dube, R Jadeja, MS Dhoni (c & wk), D Chahar, T Deshpande, M Pathirana, M Theekshana. https://t.co/hpXamvn55U #TATAIPL #CSKvMI #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)