Netherlands Beat West Indies: झिम्बाब्वेमध्ये खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय विश्वचषक पात्रता (ODI World Cup Qualifiers) फेरीत सोमवारी मोठा अपसेट समोर आला. वेस्ट इंडिज आणि नेदरलँड्स (NET vs WI) यांच्यात झालेल्या सामन्यात नेदरलँड्सने सुपर ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजचा लाजीरवाणा पराभव केला. सामन्याचा उत्साह शेवटच्या षटकापर्यंत कायम होता. सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड्ससाठी प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर लोगान व्हॅन बीकने 6 चेंडूत 30 धावा केल्या. क्रिकेटच्या इतिहासातील सुपर ओव्हरमध्ये संघाने किंवा फलंदाजाने केलेल्या 30 धावा व्हॅन बीकच्या सर्वाधिक धावा होत्या. याआधी सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. त्याने 2008 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये 25 धावा केल्या होत्या.
Crazy SUPER OVER between Netherlands and West Indies
Netherlands - 4,6,4,6,6,4
West Indies - 6,1,1,W,W
NED won the Super over by 22 runs
Logan Van Beek , The hero of the Match 🔥🔥🔥pic.twitter.com/aLDezsBdjw
— . (@MSD_071113_) June 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)