Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील सिडनी येथे सुरू असलेला पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना अत्यंत चुरशीच्या वातावरणात खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि सॅम कॉन्स्टास (Sam Konstas) यांच्यात बाचाबाची झाली. पुढच्याच चेंडूवर बुमराहने उस्मान ख्वाजाला बाद केल्यानंतर कॉन्स्टासला जोरदार प्रतिक्रिया दिली. आता दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान पुन्हा एकदा भारतीय खेळाडू कॉन्स्टासच्या मागे लागले. यशस्वी जैस्वाल हिंदीमध्ये कॉन्स्टासला स्लेजि केले, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. विकेटच्या मागे क्षेत्ररक्षण करणाऱ्या जैस्वालने (Yashasvi Jaiswal) कॉन्स्टासला सतत शाॅट मिस होत असल्याचे पाहिल्यावर त्याने यावेळी त्याला स्लेजिंग केले. जैस्वाल म्हणाला, "क्या हो गया शॉट नहीं दिख रहे क्या? ओए कोंटास। शॉट नहीं लग रहे क्या अभी।"

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)