Viral Video: 24 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल सामना झाला. सामन्यादरम्यान हाणामारी झाल्याची घटना समोर आली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टेडियममध्ये बसलेल्या मुंबई आणि गुजरातच्या चाहत्यांमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान जोरदार लाथा-बुक्क्या झाल्या, तरीही काही लोक भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करताना दिसले. IPL 2024 चा पाचवा सामना रविवारी अहमदाबादमध्ये खेळला गेला. गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना अतिशय रोमांचक होता, ज्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला.

पाहा व्हिडीओ: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)