Guys  Kissing Viral Video: उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये ट्रिपल सीट गाडी चालवतांना  चुंबन घेत असलेल्या दोन मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रामपूर पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेतली असली तरी, पोलिस त्या मुलांची ओळख पटवू शकले की नाही हे अस्पष्ट आहे. एका ट्विटमध्ये, रामपूर पोलिसांनी सांगितले होते की, व्हिडिओमध्ये दिसणारी स्कूटीची नंबर प्लेट स्पष्ट नाही आणि ते मुलांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. आता, एका ट्विटर वापरकर्त्याने चालत्या स्कूटीवर चुंबन घेणाऱ्या मुलांचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुलांचे चेहरे दिसत आहेत. या व्हिडिओला उत्तर देताना रामपूर पोलिसांनी आवश्यक कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. 

पाहा व्हिडीओ: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)