Viral Video: ई रिक्षा चालक एका व्यक्तीला भररस्त्यात फरफटत नेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. चोरीच्या वादातून रिक्षा चालकाने तरुणासोबत असं केल्याचे समोर आले आहे. ही घटना कोणत्या शहरात घडली हे समजू शकले नाही. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे भरधाव रिक्षाला व्यक्ती लटकून आहे आणि रस्त्याच्या मधोमद घेऊन जात आहे. रस्त्यावरून जाताना अनेक जण रिक्षाचालकाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्याने एक ऐकले नाही. (हेही वाचा- शाहरुख आणि लेक सुहाना खान दिसणार एकाच चित्रपटात; सिद्धार्थ आनंद यांच्या डॉनमध्ये साकारणार भूमिका)
E-Rickshaw Drags A man who accuses him of stealing gas cylinders
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)